Uttar Maharashtra

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून पुणे ते दिल्ली उलट पायी प्रवास

Published by : Vikrant Shinde

मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही मागणी चांगलीच जोर धरू लागली आहे. अनेक मराठा संस्था, संघटना या मागणीची पूर्तता व्हावी ह्याकरीता काम करत आहेत अश्यातंच आणखी एका व्यक्तीने ही मागणी पुर्ण व्हावी ह्याकरीता अनोखा मार्ग निवडला आहे.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून थेट पुणे ते दिल्ली असा उलट पायी प्रवास करणारा एक अवलिया नुकताच नाशिकच्या येवला शहरात दाखल झाला आहे. या अवलीयाचे नाव आहे बापूराव गुंड..पुणे जिल्ह्यातील फुरसुंगी येथून बापूराव गुंड हे उलट पायी निघाले असून दिल्ली दरबारी त्यांना दाखल व्हायचे आहे.

मराठा आरक्षण तात्काळ मंजूर करावे, मतदारांना मतदान करण्यासाठी सक्ती करण्यात यावी, महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात यावे ,बेटी बचाओ, बेटी पढाओ आदी मागण्यांचे निवेदन ते दिल्ली दरबारी सरकार पुढे ठेवणार आहे.त्यानंतर जंतर मंतर येथे उपोषण देखील करणार असल्याचे त्यांनी येवल्यात दाखल झाल्यानंतर सांगितले. 

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी