देशातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी डिजीटल विद्यापीठ सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी ही घोषणा केली.
देशातील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी PM eVIDYA चॅनेल सुरु करणार असल्याची माहिती केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी दिलीय.PM eVIDYA मधील वन क्लास वन टीव्ही चॅनेल योजना वाढवण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पहिली ते बारावीसाठी चॅनेल सुरु करणार असून त्याची संख्या १२ वरुन २०० पर्यंत वाढवण्यात येईल. प्रादेशिक भाषांमध्ये हे चॅनेल काम करतील. यासाठी इंटरनेट रेडिओ आणि डिजीटल साधनांचा वापर करण्यात येईल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आहे.
डिजीटल विद्यापीठ सुरु करणार असून डिजीटल विद्यापीठ देशातील प्रादेशिक भाषांमध्ये सुरु होणार. डिजीटल विद्यापीठांशी देशातील नामांकित विद्यापीठांचे करार असणार असंही त्यांनी सांगितलं.