रशिया-युक्रेनमधील संघर्ष ताणला जात असताना आता युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी भारताकडून मदत मागितली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे झेलेन्स्किंनी यांनी मदत मागितली आहे. या संदर्भातले वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी ट्विट देखील केले आहे. भारताचे असंख्य विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे आता भारत यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रशिया-युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) सध्या जगाला हादरवून सोडले आहे. आतापर्यंत युक्रेनला ठोस मदत करण्यासाठी कुणीही पुढे आले नसल्याने युक्रेनची अवस्था दिवसेदिवस बिकट होत चालली होती. रशियाकडून युक्रेवर सतत हल्ले चढवण्यात येत आहेत. या युद्धात अनेक भारतीय नागरिकही अडकले आहे. अशा परिस्थित भारत एखादी ठोस भूमिका घेऊन या दहशतीतून युक्रेनला बाहेर काढेल. अशी अपेक्षा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना आहे. त्यामुळेच त्यांनी मोदींकडे मदतीसाठी धाव घेतली आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोदोमीर झेलेन्स्की यांनी ट्विटमध्ये म्हटलेय, भारताने आतापर्यंत चर्चेतून मार्ग काढण्याचा सल्ला दिला होता. मात्र आता मोदी आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या चर्चेनंतर समीकरणं बदलणार का, असाही सवाल उपस्थित झाला आहे. या युद्धात युक्रेनचा अनेक भाग रशियाच्या ताब्यात गेला आहे. आता भारत यात काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.