लोकशाही न्यूज नेटवर्क | कृषी कायद्याविरोधात शेतकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. यातच केंद्राने नव्याने लागू केलेल्या कृषी कायदे विरोधात किसान आंदोलन जारी असतानाच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकार विरोधात बोलले आहेत.
अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले असून त्या पत्रात कृषी कायदे विरोधात मागण्या मान्य न केल्यास आयुष्यातील शेवटचे आमरण उपोषण जानेवारी अखेर सुरु करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. रामलीला मैदानावर देशव्यापी आंदोलन पुकारून आमरण उपोषण केले होते.
अण्णांनी डिसेंबर मध्ये केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनाही पत्र लिहिले होते आता त्यांनी मोदींना पत्र लिहिले आहे. अण्णा म्हणाले की, दिल्ली येथे रामलीला मैदानावर उपोषण करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी चार पत्रे लिहिली होती मात्र त्याचे उत्तर मिळाले नाही.
यासोबतच केंद्राशी पाच वेळा पत्रव्यवहार केला पण एकाही प्रश्नांचे उत्तर मिळालेले नाही. फेब्रुवारी २०१९ पासून अण्णा राळेगण सिद्धी येथे स्वामीनाथन आयोगाने सुचविलेल्या शिफारसी लागू कराव्यात यासाठी आंदोलन करत आहेत.