शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत 'ठाकरे' सिनेमा २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता. संपूर्ण देशभरातून जनतेने ठाकरे या सिनेमाला प्रचंड प्रतिसाद दिला होता. हिंदी मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनर आधारित आता पुन्हा एकदा ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट लवकरच येणार असल्याची माहिती शिवेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मला नेहमी असे वाटत की ज्या विषयावर कोणीही सिनेमा तयार करत नाही त्यावर आपण लिहावे, म्हणूनच मी ठाकरे हा सिनेमा तयार केला. आता ठाकरे सिनेमाचा दुसरा पार्ट देखील बनवत आहोत', असे राऊत म्हणाले. औरंगाबाद मधील एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना संजय राऊतांनी ही माहिती दिली.
ठाकरे सिनेमात बाळासाहेबांचा संपूर्ण प्रवास दाखवण्यात आला होता. या सिनेमात बाळासाहेबांची भूमिका अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी यांनी निभावली होती होता. तर अमृता राव हिने माँ साहेबांची भूमिका निभावली होती. स्वत: संजय राऊत यांनी सिनेमाची निर्मिती केली होती तर अभिजीत पानसे यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.