व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस यांच्यानंतर व्हॉट्सअॅपचे आणखी एक प्रमुख कार्यकारी विनय चोलेट्टी यांनी राजीनामा दिला आहे. व्हॉट्सअॅप-पे इंडियाचे प्रमुख विनय चोलेट्टी यांनी बुधवारी LinkedIn द्वारे राजीनामा जाहीर केला. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी पदभार स्वीकारला होता. चोलेट्टी यांनी सप्टेंबरमध्ये मनीश महात्मे यांची जागा घेतली होती.
विनय चोलेट्टी ऑक्टोबर 2021 मध्ये WhatsApp-Pay बॅक मध्ये व्यापारी पेमेंट्स प्रमुख म्हणून सामील झाले होते, त्यानंतर सप्टेंबर 2022 मध्ये त्यांना WhatsApp-Pay चे भारत प्रमुख बनवण्यात आले. चोलेट्टी यांनी सप्टेंबरमध्ये व्हॉट्सअॅपचा राजीनामा दिल्यानंतर अॅमेझॉनमध्ये सामील झालेल्या मनीष महात्मे यांची जागा घेतली.
विनय चोलेट्टीआधी व्हॉट्सअॅप इंडियाच्या इतर अनेक प्रमुख अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. अलीकडेच व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख अभिजित बोस, मेटा इंडियाचे सार्वजनिक धोरण संचालक राजीव अग्रवाल आणि मेटा इंडियाचे प्रमुख अजित मोहन यांनीही कंपनी सोडली आहे.
लिंक्डइनवर राजीनामा माहिती
राजीनामा देताना चोलेट्टी यांनी एका लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिले, "मी माझ्या पुढच्या टप्प्यावर जात आहे. मला ठाम विश्वास आहे की व्हॉट्सअॅपमध्ये डिजिटल पेमेंट आणि आर्थिक समावेशना भारतात अभूतपूर्व पद्धतीने बदलण्याची ताकद आहे. मला इच्छा आहे की तुमच्या क्षमतेचा फायदा घ्या."