व्हॉट्सअॅप (WhatsApp) नेहमीच युजर्ससाठी नवनवीन फिचर्स घेऊन येत असते. यावेळी ही व्हॉट्सअॅपने असाच एक नवीन फिचर्स घेऊन आला आहे. व्हॉट्सअॅपने कम्युनिटीज हे नवीन फिचर युजर्ससाठी घेऊन येणार आहे. या नवीन फीचरमुळे युजर्सना ग्रुपमध्ये उपगट तयार करता येणार आहे. या फिचरचा अनेकांना खूप फायदा होणार आहे. मात्र व्हॉट्सअॅपचे हे फीचर तुमच्यापर्यंत येण्यासाठी काही वेळ लागणार आहे. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी व्हॉट्सअॅपवर कम्युनिटीज हे नवीन फिचर युजर्ससाठी घेऊन येणार असल्याची घोषणा केली आहे.
कम्युनिटीज या फीचरमुळे युजर्स ग्रुपमध्ये कनेक्ट होऊन तुम्ही ग्रुपमधील निवडक लोकांचा एक उपगट तयार करू शकता आणि त्यांना तुम्ही मेसेजही पाठवू शकता. युजर्सना या फीचरचा वापर करण्यासाठी अँड्रॉइड मोबाइलमध्ये चॅटच्या टॉपवर तर ios यूझरला खालच्या बाजूला कम्युनिटीज नावाच्या टॅबला क्लिक करून इथून युझर नवा ग्रूप किंवा आधीपासूनच असलेल्या ग्रूपमध्ये सब-ग्रूप तयार करता येणार आहे.
WhatsApp यूझर्स आता एकाचवेळी ३२ सदस्यांसोबत व्हिडिओ कॉल करू शकतात. तसेच ग्रूप साइजमध्ये वाढ केली असून आता सदस्य संख्या १०२४ इतकी करण्यात आली आहे.