विवोनं यंदा आपली नवीन टी सीरिज भारतात सादर केली आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत Vivo T1 स्मार्टफोन सादर करण्यात आला आहे. आज या सीरिजचा विस्तार करत कंपनीनं Vivo T1 44W आणि Vivo T1 Pro 5G हे दोन हँडसेट सादर केले आहेत. या लेखात आपण Snapdragon 778G प्रोसेसर, 10GB रॅम, 66W फास्ट चार्जिंग आणि 64MP कॅमेरा असलेल्या Vivo T1 Pro 5G ची माहिती पाहणार आहोत. जो एप्रिलमध्ये आलेल्या iQOO Z6 Pro 5G चा रीब्रँड व्हर्जन वाटतो.
Vivo T1 Pro 5G स्मार्टफोनचा 6GB रॅम व 128GB इंटरनल स्टोरेज मॉडेल 23,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर रॅम 8GB रॅम व 128GB मॉडेलची किंमत 24,999 रुपये आहे. हा फोन टर्बो ब्लॅक आणि टर्बो सियान कलरमध्ये 7 मेपासून कंपनीच्या वेबसाईटसह फ्लिपकार्ट आणि ऑफलाइन स्टोर्समधून विकत घेता येईल.
Vivo T1 Pro च्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4,700mAh ची बॅटरी मिळते जी 66 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.