ट्विटर डाऊन झाल्याने जगभारातील युजर्सनी नाराजी व्यक्त केली आहे. आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट Downdetector.com च्या हवाल्याने वृत्तसंस्था ट्विटरने दिलेल्या वृत्तानुसार सकाळी 7:40 पर्यंत युनायटेड स्टेट्समधील 10,000 हून अधिक युजर्सनी सोशल मीडिया वेबसाइटवर प्रवेश करताना अडचणी येत असल्याची तक्रार केली आहे. अनेकांचे ट्विटर नोटीफिकेशन्स काम करत नाही. काहींना लॉग इन करताना अडचणी येत आहेत.
भारतातील 'या' शहरांमध्ये अडचणी
दिल्ली, मुंबई, चेन्नई, बंगळुरू आणि नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे. ट्विटर वापरताना अडचणी येत असल्यामुळे वापरकर्त्यांकडून राग व्यक्त केला जात आहे.