लोकशाही न्यूज नेटवर्क | 2021 या नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात टॉप-10 सर्वाधिक विक्री झालेल्या कारची माहिती समोर आली आहे.यंदाच्या वर्षातील जानेवारी महिन्यात कोणत्या कंपनीच्या गाडयांना किती प्रतिसाद मिळाला? यासंदर्भात माहिती जाणून घेऊयात…
▪️ नंबर 10 : मागील वर्षाच्या तुलनेत मारुती सुझुकीची ब्रेझा कारची चांगली विक्री झाली. विक्री जवळपास 5 टक्क्यांनी वाढली आहे.
▪️ नंबर 9 : यंदाच्या वर्षी जानेवारीमध्ये एकूण 10 हजार 865 Hyundai Grand i10 कारची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी याचवेळी फक्त 8 हजार 774 कारची विक्री झाली होती.
▪️ नंबर 8 : यावर्षी जानेवारीत एकूण 11, 680 Maruti Suzuki Eeco कारची विक्री झाली आहे. तर मागील वर्षी याच दरम्यान 12 हजार 324 कारची विक्री झाली होती.
▪️ नंबर 7 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 11 हजार 779 Hyundai Venue विकल्या, तर मागील वर्षी यावेळी फक्त 6 हजार 733 युनिट्सची विक्री झाली होती.
▪️ नंबर 6 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 12 हजार 284 Hyundai Creta विकल्या तर, मागील वर्षी फक्त 6 हजार 900 क्रेटा कारची विक्री झाली होती.
▪️ नंबर 5 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 15 हजार 125 Maruti Suzuki Dzire कारची विक्री झाली. तर, मागील वर्षी यावेळी हा आकडा 22 हजार 406 इतका होता.
▪️ नंबर 4 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 16 हजार 648 Maruti Suzuki Baleno कारची विक्री झाली. तर, गतवर्षी जानेवारीमध्ये 20 हजार 485 बलेनो कार विकल्या होत्या.
▪️ नंबर 3 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 17 हजार 165 Maruti Suzuki Wagonr कारची विक्री झाली. तर, मागील जानेवारीत 15 हजार 232 कार विकल्या होत्या.
▪️ नंबर 2 : जानेवारी 2021 मध्ये एकूण 17 हजार 180 स्विफ्ट कारची विक्री झाली. तर, मागील जानेवारीत 2020 मध्ये 19 हजार 981 युनिट्सची विक्री झाली.
▪️ नंबर 1 : जानेवारी 2021 मध्ये 18 हजार 260 Maruti Suzuki Alto कारची विक्री झाली. तर, गेल्या वर्षी जानेवारीत 18 हजार 914 युनिट्सची विक्री झाली होती.