तंत्रज्ञान

इन्स्टाग्रामच्या (Instagram) लोकप्रियतेत दिवसेंदिवस वाढ

Published by : Vikrant Shinde

इन्स्टाग्रामची (Instagram) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. विशेषतः इन्स्टाग्रामने रील्स (Instagram Reels) फिचर आणल्यापासून तर तरुण सााई, सिने अभिनेते, क्रिकेटपटू हे त्यांच्या टीमसोबत रील्स बनवत आहेत. हे रील्स बनवणाऱ्या टीममधील लोकांबद्दल कुणालाच माहिती नसते. मात्र आता इन्स्टाग्रामने एका नव्या फिचरची घोषणा केली आहे….या फिचारच्या माध्यमातून रील्स बनवण्यात मदत करणाऱ्या लोकांना आता इन्स्टाग्रामवर श्रेय देणे शक्य होणार आहे. एन्हांस्ड टॅग्स (Enhanced Tags) या नव्या फिचरमुळे इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या रीलमध्ये संपूर्ण टीमचे नाव नमूद करता येणार आहे.

रीलमध्ये टीमचे नाव नमूद केले तर फॉलोअर्सना (Followers) समजू शकेल की, रील्स तयार करण्यासाठी तुम्ही कुठली टीम वापरात आहात. एखादी व्यावसायिक टीम वापरत असाल तर त्याची माहिती आता तुमच्या फॉलोअर्सला मिळू शकेल.

तुमची युझरची विश्वासार्हता वाढू शकेल. त्यामुळे युझरचे फॉलोअर्स वाढण्यात मदत होईल. युझर आता रीलमध्ये काम केलेले स्क्रिप्ट रायटर, कंटेंट क्रिएटर, कॅमेरामन, व्हिडीओ एडिटर आणि सोशल मीडिया मॅनेजरची नावे नमूद करू करू शकतील.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी