लोकशाही न्यूज नेटवर्क
बहुचर्चित असा दमदार Redmi Note 10 लवकरच बाजारामध्ये उपलब्ध होणार आहे. 10 मार्च रोजी हा फोन लाँच होणार आहे. या सीरिमध्ये रेडमी नोट 10 प्रो , रेडमी नोट 10 – 5G आणि रेडमी नोट 10 – 4G हे फोन लाँच केले जाणार आहेत . याच्या फीचर्सविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही .
भारतीय स्टॅंडर्ड ब्युरो (BIS) आणि यूएस फेडरल कम्युनिकेशन्स कमिशन (FCC) यांच्या सर्टिफिकेशन साइटवरदेखील हे फोन दिसत आहेत. परंतु शाओमी इंडिया तर्फे फोनच्या फीचर्स सं-दर्भातील कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शाओमी इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी केलेल्या ट्विटमध्ये 'सबसे स्मूथ' असा उल्लेख केल्यानं हा फोन नवीन SoCs सह मिळण्याची शक्यता आहे.
रेडमी नोट 10 (Redmi Note 10) हा फोन दोन प्रकारांमध्ये सादर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज आणि 6 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज असे ते प्रकार असतील. रेडमी नोट 10 Pro हा फोन 6 जीबी 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी 128 जीबी स्टोरेज, आणि 8 जीबी 128 जीबी स्टोरेज या प्रकारांमध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फोनमध्ये 64 मेगापिक्सेल कॅमेरा आणि 5050mAh क्षमतेची बॅटरी असेल आणि चार्जिंगसाठी फास्ट चार्जिंगची सुविधा असलेला चार्जरदेखील मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आता या फोनच्या लाँचिंग डेटकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.