तंत्रज्ञान

Poco | पोकोचा X3 GT लाँच

Published by : Lokshahi News

पोकोफोन नवीन दमदार फोन सादर केले आहेत. या फोनला 64MP कॅमेरा, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh बॅटरीसह Poco X3 GT लाँच करण्यात आला आहे. POCO ने मिडरेंज सेगमेंटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने जागतिक बाजारात नवीन व दमदार Poco X3 GT स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सध्या मलेशियामध्ये लाँच करण्यात आला आहे आणि लवकरच हा फोन इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल. परंतु भारतात हा फोन येणार नसल्याची माहिती पोको इंडियाचे डायरेक्टर अनुज शर्मा यांनी दिली आहे.

पोको एक्स3 जीटी मध्ये 8GB रॅम, MediaTek Dimensity 1100 चिपसेट, 67W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh ची बॅटरी असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.

Poco X3 GT ची किंमत
मलेशियामध्ये पोको एक्स3 जीटीच्या 8 जीबी रॅम + 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत RM 1199 (अंदाजे 21,000 रुपये) ठेवण्यात आली आहे. तसेच फोनचा 8 जीबी रॅम + 256 जीबी इंटरनल मेमरी व्हेरिएंट RM 1399 (अंदाजे 24,500 रुपये) मध्ये उपलब्ध होईल.

Poco X3 GT चे स्पेसिफिकेशन्स
पोको एक्स3 जीटी स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा फुलएचडी+ आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये मीडियाटेकचा डायमनसिटी 1100 चिपसेट देण्यात आला आहे. हा पोको फोन अँड्रॉइड 11 आधारित मीयुआय 12.5 वर चालतो.

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे