पोकोनं आपला नवा 5G फोन भारतात लॉन्च केला आहे. कंपनीनं या फोनची किंमत खूप कमी ठेवली आहे. तरीही नव्या POCO M4 5G स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी, 50MP कॅमेरा आणि 90Hz रिफ्रेश रेट मिळतो. हा नवीन पोको मोबाईल फक्त 12,999 रुपयांची किंमतीसह आला आहे. त्यामुळे पोको एम4 5जी भारतातील सर्वात स्वस्त 5जी फोन्स पैकी एक आहे.
पोको एम4 5जी स्मार्टफोन 6.58 इंचाच्या फुलएचडी+ आयपीएस एलसीडी पॅनलसह बाजारात आला आहे. वॉटर ड्रॉप डिजाईनसह 90हर्ट्ज रिफ्रेश रेट, 600निट्स ब्राईटनेस आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो. फोटोग्राफीसाठी ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅश, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा सेन्सर आहे.
POCO M4 5G स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 12,999 रुपये आहे. तर 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 14,999 रुपये ठेवण्यात आली आहे. येत्या 5 मेपासून फ्लिपकार्टवर हा डिवाइस Cool Blue, Power Black आणि POCO Yellow कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होईल.