सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात होणारा वापर पाहता केंद्र सरकारने नव्या डिजीटल नियमांबाबत कठोर भूमिका घेतली आहे. केंद्राने मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नवीन नियमांचं पालन करण्याचा स्टेटस रिपोर्ट त्वरित सादर करण्याचे आदेश दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला पाठवलेल्या पत्रात, बुधवारी नवीन नियम लागू झाल्यानंतर त्यांना अतिरिक्त चौकशीबाबत पाऊल उचलावी लागतील असं म्हटलं आहे. नव्या नियमांतर्गत सोशल मीडिया कंपन्यांना हे अधिकारी नियुक्त करावे लागतील.
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स कंपनी एखाद्या साहाय्यक कंपनीद्वारे भारतात सेवा देतात. यापैकी काही आयटी अॅक्ट आणि नवीन नियमांतर्गत महत्त्वाच्या सोशल मीडिया इंटरमीडियर्सच्या परिभाषेत येतात. अशा परिस्थितीत या नियमांचं पालव करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अॅपचं नाव, वेबसाईट आणि सर्विसेससारख्या डिटेल्सशिवाय तीन प्रमुख कर्मचाऱ्यांच्या तपशीलासह भारतातील प्लॅटफॉर्मचा प्रत्यक्ष पत्ता द्यावा लागेल.