हल्ली प्रत्येकजण आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. अनेकजण सोशल मीडियाचा वापर मनोरंजनासाठी करतात. तर काहीजण फक्त बातम्या पाहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.
यातच आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची मूळ कंपनी मेटानं एक मोठा निर्णय घेतला आहे.कॅनडातील फेसबुक आणि इन्स्टाग्राम युजर्स यापुढे फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बातम्या पाहू शकणार नाहीत. मेटानं कॅनडामध्ये फेसबुक आणि इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या बातम्याही ब्लॉक केल्या आहेत.
मेटाच्या निर्णयामुळे कॅनडातील फेसबुक आणि इंस्टाग्राम युजर्सना धक्का बसणार आहे. आता बातम्यांच्या लिंक कॅनडातील कोणत्याही युजर्सना पाहता येणार नाहीत. बातम्यांच्या लिंक ब्लॉक करण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली आहे. हे पुढचे अनेक आठवडे सुरुच राहिल. असं मेटानं एका निवेदनात म्हटलं आहे. सोशल मीडिया कंपन्यांना बातम्यांच्या बदल्यात वृत्त प्रकाशकांना पैसे द्यावे लागतील, या कायद्याचा निषेध म्हणून मेटाने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.