इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून त्यामाध्यमातून पैसे मागणे ह्यागोष्टी आज काल सर्रास झालेल्या पाहायला मिळतात. यामुळेच इन्स्टाग्रामने (Instagram) एक नवं अपडेट आलं आहे. हे अपडेट युजर्सला अकाउंट सुरक्षित-सेफ ठेवण्यासाठीच्या (Account Security) पद्धती सांगेल, असं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल.
लॉगइन आधीच युजरला सिक्योरिटी चेकअप नोटिफिकेशन मिळेल. तुमचं अकाउंट हॅक झालं की, नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट अॅपद्वारे लॉगइन करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये लॉगइन अॅक्टिव्हिटी (Login Activity) चेक करा. यात त्या सर्व डिव्हाईसची लिस्ट दिसेल, ज्यात तुमचं अकाउंट नुकतंच लॉगइन केलं गेलं आहे.
अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी काय कराल?
मोबाईल नंबरद्वारे इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये टू-फॅक्टर (Two-Factor Authentication) ऑथेंटिकेशन ऑन करा. यासाठी गुगल ऑथेंटिकेशनचाही वापर करू शकता.