सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तरुणांकडून सर्वाधिक इन्स्टाग्रामचा वापर केला जातो. नुकतीच इन्स्टाग्रामने सिक्युरिटी आणि प्रायव्हसी वाढवली आहे. नव्या निमयांनुसार, एखाद्या अकाउंटसाठी साइनअप करण्यासाठी त्या व्यक्तीचं वय कमीत कमी 13 वर्ष असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तरुणांच्या सुरक्षेच्यादृष्टीने काही इतरही बदल केले आहेत. इन्स्टाग्रामचे प्रमुख एडम मोसेरी (Adam Mosseri) यांनी, 16 वर्षाहून कमी वयोगटातील व्यक्ती इन्स्टाग्रामसाठी साईनअप करू शकतो अशी माहिती दिली आहे.
त्याला एक प्रायव्हेट अकाउंटमध्ये डिफॉल्ट म्हणून मानलं जाईल. तसंच युजर्स अकाउंट ओपन करताना पब्लिक किंवा प्रायव्हेट अकाउंट यापैकी एकाची निवड करू शकतात. युजरचं हे अकाउंट प्रायव्हेट मानलं जाईल आणि त्याला मॅन्युअल रुपात एका पब्लिक अकाउंटमध्ये स्विच करावं लागेल. हे नवे बदल भारतात लागू केले जाणार आहेत.
16 वर्ष वयोगटातील युजर्स ज्याचं आधीपासूनच पब्लिक अकाउंट आहे, त्यांना एक नोटिफिकेशन पाठवलं जाईल, ज्यात प्रायव्हेट अकाउंटच्या फायद्यांबाबत सांगितलं जाईल. तसंच इन्स्टाग्राम प्रायव्हसी सेटिंग्जमध्ये कसे बदल करावेत हेदेखील सांगितलं जाईल.
या बदलाप्रमाणेच इन्स्टाग्राममध्ये (Instagram) नवं अपडेट आलं आहे. या अपडेटमुळे एखाद्या युजरचं अकाउंट आधीच हॅक झालं असेल किंवा त्याच्या अकाउंटचा डेटा लीक झाला असल्यास, याबाबत युजरला माहिती मिळेल. लॉगइन आधीच युजरला सिक्योरिटी चेकअप नोटिफिकेशन मिळेल. तुमचं अकाउंट हॅक झालं की, नाही हे तपासण्यासाठी सर्वात आधी आपलं इन्स्टाग्राम अकाउंट अॅपद्वारे लॉगइन करा.