Threads account: ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी मेटाने थ्रेड्स अॅप लाँच केले आहे. सुरुवातीला अॅपमध्ये काही त्रुटी असल्या तरीही आतापर्यंत 30 दशलक्षाहून अधिक लोकांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. थ्रेड अॅप जवळपास ट्विटरसारखेच आहे. तसेच, इन्स्टाग्रामचेही काही फिचर्स यात जोडण्यात आले आहेत. खरं तर, ट्विटर पेड झाल्यानंतर, मोठ्या संख्येने युजर्सने स्वतःला ट्विटरपासून दूर केले आहे. इंस्टाग्राम या युजर्सला आपल्या नवीन प्लॅटफॉर्म थ्रेडमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत आहे.
कसे कराल डाउनलोड?
थ्रेड अॅप iOS आणि Android प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. म्हणजेच ते अॅपल अॅप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते. याशिवाय, वापरकर्ते डेस्कटॉपवर साइटवरून थ्रेड वापरण्यास सक्षम असतील.
असे वापरा थ्रेड्स अॅप
थ्रेड्स हा इंस्टाग्रामचाच एक भाग आहे आणि तुम्ही इंस्टाग्रामच्या मदतीने त्यात लॉग इन करू शकता.
याशिवाय या अॅपमध्ये तुम्ही इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सनाही फॉलो करू शकता.
ज्यांचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे तेच थ्रेड्स वापरू शकतात. म्हणजेच, जर तुमच्याकडे इंस्टाग्राम खाते नसेल, तर तुम्ही थ्रेड चालवू शकत नाही. ते वापरण्यासाठी तुम्हाला एक इन्स्टा आयडी बनवावा लागेल.
तुम्ही थ्रेड्स खाते देखील हटवू शकत नाही. जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम खाते हटवाल तेव्हाच हे खाते हटवले जाईल.
तथापि, थ्रेड अकाउंट डिअॅक्टीव्ह करू शकता. अकाउंट डिअॅक्टीव्ह करण्यासाठी प्रोफाइलवर अकाउंट विभागात क्लिक करा. येथे तुम्हाला पर्याय दिसेल.
सध्या, वापरकर्ते थ्रेडमधील पोस्ट आणि इतरांच्या पोस्टवर टिप्पणी, री-ट्विट, लाईक इत्यादी करू शकतात.
यामध्ये ट्विटरला फॉलो आणि डीएम करण्याचा पर्याय नाही.
थ्रेड्समध्ये युजर्स 500 कॅरेक्टरपर्यंतच्या पोस्ट आणि 5 मिनिटांचे व्हिडिओ अपलोड करू शकतात.