Indian Railway : रेल्वे परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. भारतीय रेल्वेने निर्णय घेतला आहे की ते उमेदवारांना त्यांच्या निवासस्थानापासून 300 किमीच्या अंतरावर परीक्षा केंद्र देण्यासाठी Google मॅप वापरणार आहे. असे केल्याने उमेदवारांचा वेळ आणि खर्चही कमी होणार आहे. (indian railway to use google maps to allot test centres for candidates within 300 km of domicile lbsa)
परीक्षेसाठी उमेदवारांना लांबचे अंतर पार करावे लागले
RRB परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्र त्यांच्या घरापासून दूर देण्यात आल्याची तक्रार आहे. यामुळे त्यांना लांबचा प्रवास तर करावा लागतोच, शिवाय खाण्यापिण्यासाठी जादा पैसे खर्च करावे लागतात.
अशी परीक्षा केंद्रे गुगल मॅपवर जोडली जात आहेत
एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, प्रत्येक उमेदवाराने पत्त्यासह दिलेला पिन कोड त्यांच्या निवासस्थानापासून ३०० किमी असलेल्या परीक्षा केंद्राशी गुगल मॅपद्वारे जोडला जात आहे. यासोबतच बस आणि ट्रेन यांसारख्या वाहतुकीच्या विविध माध्यमांतून केंद्रापर्यंत वाहतूक करता येईल याचीही खात्री केली जात आहे.
या तारखेपासून रेल्वेची ही प्रक्रिया होणार सुरू
रेल्वेची ही नवीन प्रक्रिया 30 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी राबवण्यात येणार आहे. या परीक्षेत 7,026 पदांसाठी 90 केंद्रांवर परीक्षा होणार असून, यामध्ये सुमारे 60 हजार उमेदवार सहभागी होणार आहेत.
सध्या 99 टक्के उमेदवारांना 300 किलोमीटरच्या अंतरावर परीक्षा केंद्र उपलब्ध करून देऊ शकलो आहोत, तर 100 टक्के महिला उमेदवारांना 400 किलोमीटरच्या अंतरावर परीक्षा केंद्रांमध्ये बसवण्यात आले आहे. अशी माहिती रेल्वेने दिली आहे.