ट्विटर ब्लू टिक वापरकर्त्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ट्विटरचे सीईओ एलॉन मस्कने माहिती दिली आहे की या मायक्रो-ब्लॉगिंग वेबसाइटवर व्हेरिफाईड ब्लू टिकधारकांच्या खात्यातून कोणत्या तारखेपासून ब्लू टिक्स काढल्या जातील. एलॉन मस्कने ट्विटद्वारे सांगितले आहे की, 20 एप्रिल रोजी टि्वटरवरील लेगसी ब्लू टिक मार्क म्हणजेच व्हेरिफाईड अकाऊंट्समधून ब्लू टिक काढून टाकण्यात येईल. त्याच्या अलीकडील ट्विटमध्ये, त्याने म्हटले आहे की "20 एप्रिलपासून लेगसी ब्लू चेकमार्क काढले जातील.
20 एप्रिलपासून, ब्लू टिक चेकमार्क असलेल्या वापरकर्त्यांच्या खात्यातून ब्लू टिक काढून टाकला जाईल आणि फक्त तेच वापरकर्ते जे ट्विटर ब्लूचे सदस्य आहेत ते ठेवू शकतील. तुम्हाला तुमच्या ट्विटर अकाऊंटसाठी ब्लू टिक टिकवून ठेवायचे असेल, तर तुम्हाला ट्विटर ब्लूचे सदस्यत्व घ्यावे लागेल.
2009 मध्ये, ट्विटरने ब्लू टिक मार्क देण्यास सुरुवात केली आणि याद्वारे राजकीय नेते, सेलिब्रिटी इत्यादी सेलिब्रिटींच्या सत्यापित खात्यावर ब्लू टिक दिली गेली. कंपनीने यापूर्वी ब्लू टिकसाठी शुल्क आकारले नसले तरी एलॉन मस्क ट्विटरचे मालक बनताच त्यांनी ट्विटरच्या या सेवेसाठी शुल्क आकारण्याची घोषणा केली होती.