FIFA World Cup Team Lokshahi
तंत्रज्ञान

FIFA World Cup मध्ये गुगलनेही केला रेकॉर्ड

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे.

Published by : shamal ghanekar

कतार येथे झालेल्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ असा पराभव केला. तब्बल ३६ वर्षांनंतर त्याला विश्वचषक जिंकता आला आहे. 1978 आणि 1986 नंतर त्याने आता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिल्याने सामना अतिरिक्त वेळेत गेला. तिथे लिओनेल मेस्सीने गोल करून अर्जेंटिनाला ३-२ ने आघाडीवर नेले, पण कायलियन एमबाप्पेच्या मनात काही वेगळेच होते. त्याने 117व्या मिनिटाला गोल करून सामना 3-3 असा बरोबरीत आणला. यानंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने सामना जिंकला.

मात्र तुम्हाला माहित आहे का? गुगलच्या २५ वर्षांच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदा घडले आहे. ते म्हणजे गुगलने एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ती कामगिरी म्हणजे दीड तासाच्या सामन्यावेळी गुगलवर FIFA World Cup 2022 जगभरामध्ये सर्च केले जात होते. तसेच याबद्दलची माहिती स्वतः गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी एक ट्विट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले की, '#FIFAWorldCup यादरम्यान गुगलवर जास्त सर्च करण्यात आले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी