फेसबुकने विकत घेतलेलं प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या इन्स्टाग्रामची सेवा काल जगभरात काही काळासाठी ठप्प झाली होती. या प्लॅटफॉर्मवर यूझर्सना अडचणी येत होत्या, मात्र काही काळातच या सेवा सुरळीत करण्यात आल्या.
इन्स्टाग्राम ओपन करताच ते ओपन न होताच डायरेक्ट क्लोज होत असल्यामुळे यूझर्सना अडचणी येऊ लागल्या. स्टोरी टाकण्यात, इन्स्टावर फोटो अपलोड करण्यास तसेच इतर सोयींचा लाभ घेण्यामध्ये यूझर्सना अडचणी येऊ लागल्या.
झालेल्या प्रकरणामुळे आता इन्स्टाग्रामवर तसेच ट्वीटरवर देखील इन्स्टाग्राम डाऊन अशाप्रकारे दोन हॅशटॅग ट्रेंड होताना पहायला मिळाले. यूजर्सनी नाराजी तर व्यक्त केलीच मात्र फेसबुक आणि संबंधित सेवांची मिम्सद्वारे खिल्ली देखील उडवलेली पहायला मिळाली.