BSNL | BSNL 197 rupees plan team lokshahi
तंत्रज्ञान

आता फक्त 197 रुपयांमध्ये 3 महिन्यांसाठी दररोज 2 GB डेटा आणि मोफत कॉलिंग

जाणून घ्या प्लॅनचे तपशील

Published by : Shubham Tate

BSNL 197 Rupees Plan : एकीकडे Jio आणि Airtel सारख्या कंपन्या त्यांचे दर सातत्याने वाढवत आहेत, तर दुसरीकडे भारत सरकारची कंपनी BSNL ग्राहकांसाठी सातत्याने स्वस्त आणि चांगले प्लॅन आणत आहे. ज्याचा लोकांना खूप फायदा होत आहे. इंटरनेट रिचार्जचा खर्चही कमी होत आहे. यामध्ये, BSNL ने आणखी एक उत्तम प्लॅन आणला आहे ज्यामध्ये तुम्हाला फक्त 200 रुपयांमध्ये दररोज 2 GB डेटा मिळणार आहे, तोही 100 दिवसांसाठी. (bsnl new plan bsnl launches new 197 rupees prepaid plan users get 2 gb data day 3 months)

काय आहे बीएसएनएलचा प्लान

BSNL च्या 197 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 100 दिवसांची वैधता दिली जाते. डेटाबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये दररोज 2GB डेटा दिला जातोय. हाय स्पीड डेटा मर्यादा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग 80 Kbps पर्यंत कमी केला जातो. व्हॉईस कॉलिंगबद्दल बोलायचे झाले तर या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग उपलब्ध आहे. एसएमएस पाहता, या प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस उपलब्ध आहेत. या प्लॅनमध्ये झिंगचे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. हा बीएसएनएलचा मायग्रेशन पॅक आहे.

BSNL च्या इतर योजना

याआधी BSNL ने 5 GB डेटा असलेला प्लॅन आणला होता. या प्लॅनमध्ये, BSNL केवळ 599 रुपयांमध्ये 5GB डेटाचा लाभ देणार नाही तर इतर फायदे देखील देईल. दररोज 5GB डेटा व्यतिरिक्त, कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉईस कॉलिंग सुविधा देखील दिली जात आहे. यासोबतच दररोज रात्री १२ ते पहाटे ५ वाजेपर्यंत १०० एसएमएस आणि अमर्यादित डेटा दिला जात आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी