Online Ludo : ऑनलाइन गेमिंगने पुन्हा एकदा २३ वर्षीय तरुणाचा जीव घेतला. प्रकरण इंदूरचे असून, बसंत आपल्या मेव्हण्यासोबत तेथे राहत होता. तो एका खाजगी कंपनीत कामाला होता. त्याला ऑनलाइन लुडो खेळण्याचे व्यसन होते. या गेममध्ये त्याने पैसेही गुंतवले होते. गेमिंगमुळे वसंत खूप कर्जबाजारी झाला होता. यामुळे तो खूप तणावाखाली होता. (boy committed suicide after losing 17 thousand online ludo game)
बसंतने त्याच्या सुसाईड नोटमध्ये संपूर्ण प्रकरण नोंदवून ठेवले. जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याने लिहिले की, तो स्वत:च्या इच्छेने आत्महत्या करत आहे. कारण, त्याला ऑनलाइन गेममध्ये खूप त्रास झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्ती ऑनलाइन लुडो खेळत असे. यामध्ये त्यांचे सुमारे १७ हजार रुपयांचे नुकसान झाले. त्याने काही दिवसांपूर्वी आपल्या मेहुण्याला कर्जबाजारी झाल्याचे सांगितले होते. हे पैसे त्याने त्याच्या मालकाकडून घेतले होते. पैसे परत करणे कठीण होऊन दबाव वाढू लागल्यावर त्याने मृत्यूला कवटाळले. मृताने त्याच्या सुसाईड नोटमध्ये असेही लिहिले आहे की, 'गेममध्ये माझे पैसे गमावले आहेत. मी जे काही करत आहे, ते माझ्या स्वेच्छेने करत आहे.