तंत्रज्ञान

iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा

iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा करण्यात आली आहे. क्युपर्टिनो-कॅम्पसमध्‍ये अ‍ॅपलचा ‘फार आऊट इव्‍हेंट’ पार पडला.

Published by : Siddhi Naringrekar

iPhone 14 आणि iPhone 14 Pro बरोबरच Apple Watch, AirPod ची घोषणा करण्यात आली आहे. क्युपर्टिनो-कॅम्पसमध्‍ये अ‍ॅपलचा ‘फार आऊट इव्‍हेंट’ पार पडला. या प्रोडक्ट्ससाठी नेहमीप्रमाणे यंदाही पहिल्याच दिवशी आयस्टोअर्समध्ये गर्दी पहायला मिळण्याची शक्यता आहे. या फोनच्या माध्यमातून नोटीफिकेशन बार, नॉच यासारख्या भन्नाट संकल्पना पहिल्यांदाच वापरकर्त्यांना अनुभवता येणार असल्याने फोन कधी एकदा हातात येतोय असं अ‍ॅपलप्रेमींना झाल्याचं सोशल मीडियावरील फोन लॉंचिंग नंतरच्या प्रतिक्रियांवरुन दिसून येत आहे.

या पाच रंगांमध्ये आयफोन १४ सीरिज उपलब्ध असणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच पर्पल कलरचा समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंतचा सर्वात मोठ्या क्षमतेचा कॅमेरा अ‍ॅपलने आयफोन १४ मध्ये दिला आहे. आयफोन १४ प्रोचा कॅमेरा ४८ मेगा पिक्सेलचा असणार आहे. यामुळे आधीच्या आयफोनच्या तुलनेत आता अंधुक प्रकाशामध्येही स्पष्ट छायाचित्रे काढता येणार आहेत.

आयफोन १४ प्लस ७ ऑक्टोबरला बाजारात दाखल होणार. आयफोन १४ ची किंमत ७९९ डॉलर्स (भारतीय चलनामध्ये सुमारे ६३ हजार ५०० च्या आसपास) असेल. आयफोन १४ प्लस ८९९ डॉलर्स (भारतीय चलनानुसार ७१ हजार ५०० च्या आसपास) असणार. हे दर अमेरिकेतील असून भारतात हे दर अधिक असतील असा अंदाज आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी