टीव्ही चॅनल्स प्रमाणेच अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर चढलेल्या ओटीटी प्लॅटफॉर्मने कोरोना काळात लोकांना मनोरंजनाचे मोठे माध्यम निर्माण करून दिले.यामध्ये ॲमेझॉन प्राईमचा या प्लॅटफॉर्मचा मोठा वाटा आहे. मात्र आता या कंपनीने आपला सर्वात स्वस्त 129 रुपयांचा सब्स्क्रीप्शन प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर नव्या मेम्बर्स ला फ्री मध्ये दिली जाणारी ट्रायल सर्विस देखील बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना 329 रुपयांपासून रिचार्ज प्लान उपलब्ध आहेत.दरम्यान ॲमेझॉन ने भारतात एक नवी मिनी टीव्ही व्हिडिओ स्ट्रीमिंग सर्विस लाँच केली आहे.