आशियाई क्रीडा स्पर्धेत यशस्वी जायसवाल याने वादळी सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात यशस्वी जयस्वाल याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. यशस्वी जायसवाल याने सात षटकार आणि आठ चौकारांच्या मदतीने 48 चेंडूत शतक ठोकले. संथ खेळपट्टीवर यशस्वी जायसवाल याने नवीन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला. यशस्वीसमोर नेपाळची गोलंदाजी दुबळी आणि कमकुवत जाणवत होती. यशस्वीने ऋतुराजसोबत पॉवर प्लेमध्ये 10 च्या सरासरीने धावा ठोकल्या. त्याने अवघ्या 22 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर पुढच्या 26 चेंडूत आपले शतक देखील पूर्ण केले. यशस्वीच्या बॅटमधून चौकार आणि षटकारांचा पाऊस पडत होता. या शतकी खेळीसह यशस्वी जयस्वाल याने मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे.
नेपाळविरोधात वादळी शतक ठोकत यशस्वी जायस्वाल याने मोठा विक्रम केला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक ठोकणारा यशस्वी जायसवाल पहिला भारतीय फंलदाज ठरला आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ यंदा पहिल्यांदाच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला आहे. पहिल्याच सामन्यात यशस्वी जायसवाल याने वादळी फलंदाजी केली.
आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात शतक ठोकणारा यशस्वी जायसवाल आठवा भारतीय खेळाडू ठरला आहे. यशस्वी जायसवालच्या आधी शुभमन गिल, सुरेश रैना, रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डा यांनी शतके ठोकली आहेत.
यशस्वी जायसवालचे वादळी शतक आणि रिंकू-दुबेच्या फिनिशिंग टचच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 4 विकेटच्या मोबदल्यात 202 धावांपर्यंत मजल मारली. यशस्वी जायसवाल याने 7 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने शतक झळकावले. तर अखेरच्या षटकात शिवम दुबे आणि रिंकू सिंह यांनी 22 चेंडूत 52 धावांची भागिदारी केली.