क्रीडा

Vinesh Phogat: कुस्तीपटू विनेश फोगाटचा दिल्ली पोलिसांवर आरोप; "ब्रिजभूषण सिंह विरोधात साक्ष देणाऱ्या..."

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक हुकलेली भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने दिल्ली पोलिसांवर मोठा आरोप केला आहे. ती म्हणाली की, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा काढून घेतली आहे.

विनेश फोगटने सोशल मीडियीवर पोस्ट केली, या पोस्टमध्ये तिने लिहिले की, दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह विरोधात कोर्टात साक्ष देणाऱ्या महिला कुस्तीपटूंची सुरक्षा काढून घेतली आहे. दिल्ली पोलिसांव्यतिरिक्त, विनेश फोगट हिने या पोस्टमध्ये दिल्ली महिला आयोगाला देखील टॅग केले आहे.

विनेश फोगाटच्या आरोपानंतर आता दिल्ली पोलिसांनी विनेश फोगटचे आरोप फेटाळून लावले आहेत. सुरक्षेत कोणतीही चूक झाली नाही, असं दिल्ली पोलिसांनी म्हटलं आहे. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 किलो वजनी गटात अंतिम फेरीत दाखल होऊनही वजन वाढल्याने महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पदक जिंकू शकली नाही. अंतिम सामन्याआधी 100 ग्रॅम वजन वाढल्याने विनेश फोगाटला अपात्र घोषित करण्यात आले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी