कतारमधील विश्वचषकाचा अंतिम सामना लुसेल स्टेडियमवर गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात खेळला जात आहे. हा सामना सध्या वेगळया वळणावर आला आहे. अर्जेंटिना सामना जिंकेल असं वाटत असताना, फ्रान्सच्या संघाने दमदार कामगिरी केली. सामना सध्या २-२ असा बरोबरीत आहे. सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. दोन्ही संघांनी ही स्पर्धा दोनदा जिंकली आहे.
अर्जेंटिना आणि फ्रान्सने अतिरिक्त वेळ गाठली आहे. निर्धारित ९० मिनिटे सामना २-२ असा बरोबरीत राहिला. अतिरिक्त वेळेत प्रत्येकी 15 मिनिटांचे दोन भाग असतील. पुढील ३० मिनिटे सामना बरोबरीत राहिला, तर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजेत्याचा निर्णय घेतला जाईल.
लिओनेल मेस्सी आणि एंजल डी मारिया यांच्या गोलमुळे अर्जेंटिनाने सामन्याच्या पूर्वार्धात 2-0 अशी आघाडी घेतली. केलियन एमबाप्पेने 80व्या आणि 81व्या मिनिटाला दोन गोल केल्याने अर्जेंटिना हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. त्याच्या गोलमुळे फ्रान्सने सामन्यात पुनरागमन केले.
अंतिम सामन्यात सर्वांच्या नजरा अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीवर आहेत, जो शेवटचा विश्वचषक खेळत आहे. अशा स्थितीत मेस्सीला प्रथमच विजेतेपद मिळवून हा क्षण संस्मरणीय बनवायचा आहे. तसे, अर्जेंटिनासाठी विजय सोपा होणार नाही कारण समोर फ्रेंच संघ आहे, जो सध्याचा चॅम्पियन देखील आहे. फ्रान्सच्या संघात किलियन एमबाप्पे देखील आहे, ज्याच्याकडे सामन्याचे तोंड फिरवण्याची क्षमता आहे.