क्रीडा

Tokyo Olympics | तिरंदाजीत भारताची पदकाची आशा मावळली

Published by : Lokshahi News

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या तिरंदाजी पुरूष एकेरी स्पर्धेतील पदकाच्या आशा मावळल्या आहेत. पुरूष एकेरीच्या एलिमिनेशन राऊंड अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीत भारताचा अव्वल तिरंदाज अतानू दास याला पराभवाचा सामना करावा लागला. दुसरीकडे ५२ किलो वजनी गटातील बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या अमित पंघलचा पराभव झाला. कोलंबियाच्या युबेर्जन मार्टिनने त्याचा ४-१ अशा फरकाने पराभव केला.


देशातील आघाडीचा तिरंदाजपटू अतानू दास यांच्याकडून भारताला पदकाची अपेक्षा होती. मात्र, उपउपांत्यपूर्व फेरीतच अतानू दासला पराभवाचा सामना करावा लागला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेच्या नवव्या दिवशी पुरूष एकेरीची एलिमिनेशन राऊंड अर्थात उपउपांत्यपूर्व फेरीतील सामना झाला. यात भारताचा अतानू दास विरुद्ध जपानच्या ताकाहारु फुरूकावा यांच्यासोबत झाला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी