भारतीय महिला बॉक्सर पूजा राणीने पहिल्याच फेरीत विजयी पंच मारला आहे. पूजाने अल्जेरियाच्या चाईब इचार्कचा पराभव केला. आता पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.
आशियाई चॅम्पियन आणि या ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली पहिली भारतीय खेळाडू पूजा राणीने २० वर्षीय इचार्कला ५-० असे सहज हरवले. पूजाने तिच्या अनुभवाचा उपयोग करत इचार्क आणि सामन्यावर नियंत्रण राखले. या सामन्यात पूजाने संयम दाखवत नवख्या इचार्कला गुण मिळवण्याची संधी दिली नाही.
पाच पंचांनी पूजाला १० पैकी १० गुण दिले. इचार्कला हरवल्यामुळे पूजा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचली. पदकांच्या सामन्यात खेळण्यासाठी ती आता एक पाऊल दूर आहे.