क्रिकेटर विराट कोहलीच्या (Virat Kohli ) खराब कामगिरीमुळे आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी कोहलीचे भारतीय संघातील स्थान धोक्यात आले असून त्याला वगळण्याचा इशारा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांनी दिला होता. मात्र बाबर आझम, केव्हिन पीटरसन आणि शोएब अख्तर यांनी कोहलीला पाठिंबा देत आगामी सामन्यांत तो चांगली कामगिरी करेल असे सांगितले.
याच विराट कोहलीच्या खेळी संदर्भात माजी फलंदाज सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी म्हटले आहे की, धावांसाठी झगडणारा भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला पुन्हा सूर गवसण्यासाठी ‘‘मला २० मिनिटे कोहलीला मार्गदर्शन करता आले, तर मी त्याला फलंदाजीत कोणते बदल करावे, हे सांगू शकेन. ज्याचा त्याला फायदा होईल. यापैकी उजव्या यष्टीबाहेरील चेंडूंपुढील त्याच्या समस्येचेही निराकरण करू शकेन. आघाडीच्या फलंदाजाने या सुधारणा अवश्य करायला हव्यात,’’ असे त्यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०१९नंतर त्याला शतकही झळकावता आलेले नाही. यासोबतच ते म्हणाले की, ‘‘इंग्लंडच्या दौऱ्यावर पाहिल्यास कोहली चांगल्या चेंडूंवर बाद झाला आहे. हे चेंडू सोडता आले असते,’’ असे गावस्कर या वेळी म्हणाले.