क्रीडा

श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलकेला ऑस्ट्रेलियात अटक

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक सुरु असतानाच धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलक याला सिडनी पोलिसांनी अटक केली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 विश्वचषक सुरु असतानाच धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्रीलंकेचा क्रिकेटर दानुष्का गुनाथिलक याला सिडनी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे.

माहितीनुसार, एका महिलेने दानुष्का गुनाथिलकवर बलात्काराचा आरोप केला आहे. तिच्या तक्रारीवरून दानुष्काला सिडनीमध्ये अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुणतिलकावर २०१८ मध्येही असाच आरोप झाला होता. यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. पण तपासानंतर पोलिसांनी त्याची सुटका केली होती.

दनुष्का श्रीलंकेच्या टीमसोबत वर्ल्ड कप खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला होता. मात्र, दुखापतीमुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. यानंतर त्याच्या जागी अशेन बंदाराला संघात स्थान देण्यात आले. अशीन बंडाराने संघात त्याची जागा घेतल्यानंतरही तो संघासह थांबला होता. परंतु, नामिबियाविरोधात खेळलेल्या टी-२० सामन्यात श्रीलंकेचा पराभव झाला आहे. यामुळे संघ आता मायदेशी परतला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी