क्रीडा

चहावाल्याच्या मुलाने कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला मिळवून दिलं पहिलं रौप्य पदक

CWG 2022 : सांगलीच्या संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले रौप्यपदक

Published by : Team Lokshahi

संजय देसाई | सांगली : चहावाल्याच्या मुलाने बर्मिंगहॅम (इंग्लड) येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. संकेत महादेव सरगरने 55 किलो वेटलिफ्टिंगमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. नुकतेचं तिची बहीण काजल सरगरने खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. तिचे कौतुक पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील केले होते.

सांगली शहरातील संजयनगर या ठिकाणी राहणारे महादेव सरगर यांना तीन मुले असून यातील संकेत हा मोठा मुलगा आहे. सरगर हे मूळचे आटपाडी तालुक्यातील असून व्यवसायाच्या निमित्ताने सांगली शहरात स्थायिक झाले. सध्या ते पान टपरी आणि चहा विक्रीचा व्यवसाय करतात. लवली सर्कल याठिकाणी सरगर यांचे चहा आणि भजी विक्रीचा गाडा आहे. यातून त्यांच्या संसाराचा गाडा चालू आहे. पहाटे पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत सरगर दांपत्य राबतात. या जोरावरच सरगर यांनी संकेत व तिची लहान बहीण काजल या दोघांनाही खेळाचे धडे दिले आहेत.

अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून संकेतने वेटलिफ्टिंगचे धडे घेऊन थेट राष्ट्रकुल स्पर्धेत धडक दिली. इंग्लंडमध्ये पार पडणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग विभागात भारताचे प्रतिनिधित्व करत 55 किलो गटांमध्ये रौप्य पदक पटकावले आहे. 248 किलो वजन उचलत संकेतने कॉमनवेल्थ स्पर्धेतलं भारताला पहिलाच पदक मिळवून दिले आहे. त्याच्या या विजयानंतर सांगलीमध्ये सरगर कुटुंब आणि त्याच्या मित्रपरिवारने जल्लोष साजरा केला आहे.

नुकतेच हरियाणा या ठिकाणी पार पडलेल्या खेलो इंडिया युज गेम्स मध्ये संकेतची लहान बहिण काजल हिने सुवर्णपदक पटकावल्या होते. तिच्या यशाची सर्वत्र चर्चा झाली होती.थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मन की बात मध्ये काजल सरगर हिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचं कौतुक केलं होतं.त्यामुळे लहान बहिणीच्या पाठोपाठ मोठ्या भावाने देखील आई-वडिलांच्या कष्टाची चीज करून दाखवली आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी