Singapore Open 2022  Team Lokshahi
क्रीडा

पायाच्या दुखापतीमुळे सिंधूची जागतिक स्पर्धेतून माघार

भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने जागतिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाच्या दुखण्यामुळे तीने माघार घेतली आहे. याची माहिती सिंधूने सोशल मिडियावरुन दिली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

भारताची दोन ऑलिम्पिक पदक विजेती खेळाडू पी. व्ही. सिंधूने जागतिक स्पर्धेतून माघार घेतली आहे. पायाच्या दुखण्यामुळे तीने माघार घेतली आहे. याची माहिती सिंधूने सोशल मिडियावरुन दिली आहे.

सिंधू म्हणाली की, ‘‘राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकामुळे माझ्या आशा उंचावल्या होता. मात्र, दुर्दैवाने पायाच्या दुखापतीमुळे मला जागतिक स्पर्धेतून माघार घ्यावी लागते आहे. राष्ट्रकुल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व लढतीपासूनच पायाला वेदना जाणवत होत्या. हैदराबादला परतल्यावर तातडीने ‘एमआरआय’ चाचणी करून घेतली. त्यात डाव्या पायाची दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले आहे,’

बर्मिगहॅम येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सिंधूने सुवर्णपदक पटकावले होते.सिंधूने २०१९मध्ये जागतिक स्पर्धा जिंकण्याची विक्रमी कामगिरी केली होती.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी