कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव व ऋषभ पंत यांचे चाहते हे खूप आहेत. नेहमी त्यांचे चाहते त्यांच्याशी सोशल मिडियाच्या माध्यमातून बोलत असतात. त्यांच्या खेळाच्या कामगिरीवर प्रतिक्रिया देत असतात. असाच एका चाहत्याशी त्यांनी साधलेला संवाद सध्या सोशल मिडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रोहीत, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे मराठी चाहत्याशी बोलताना दिसत आहे. या व्हिडीओच्या शेवटी या मराठमोळ्या चाहत्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जिकलेल्या चषकांच्या बाजूला असलेली घरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवल्यानंतर रोहित शर्माने ‘जय हो’ची घोषणा दिली.
भारतीय संघातील सलामीवीर सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत यांनी मराठीत एका चाहत्याशी साधलेला संवाद सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. या मुलाला विश्वासच बसेना की, सूर्यकुमार, रोहित आणि पंत व्हिडीओ चॅटवर आहेत. तो ‘आई शप्पथ’ असं म्हणला. हे ऐकतानाच रोहितने “मराठी माणूस आला वाटतं” असं म्हटलं. त्यानंतर या चाहत्याने मुंबईत फार पाऊस असल्याचं सांगितलं. त्यावर सूर्यकुमारनेही त्याच्या रुमबाहेरील दृष्य दाखवत इथे पण पाऊस आहे असं मराठीत म्हटलं.
विशेष म्हणजे या व्हिडीओच्या शेवटी या मराठमोळ्या चाहत्याने स्थानिक क्रिकेट स्पर्धांमध्ये जिकलेल्या चषकांच्या बाजूला असलेली घरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवल्यानंतर रोहित शर्माने ‘जय हो’ची घोषणा दिल्याचं पहायला मिळत आहे. या चाहत्याने आपल्याकडे क्रिकेटच्या बऱ्याच ट्रॉफी असल्याचं सांगत भिंतीवरील फळीवर ठेवलेले चषक दाखवत, “या बघ आमच्या ट्रॉफी” असं म्हटलं. त्यावर रोहितने ‘मस्त’ असं उत्तर दिलं. त्यानंतर या चाहत्याने ट्रॉफींच्या बाजूला असणारी सिंहासनावर विराजमान झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती दाखवत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा…” अशी हाक दिली. त्यावर रोहितने “विजय असो” असं तर पंतने “जय हिंद” असं उत्तर दिलं.
हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.