Rohit Sharma | shahid afridi | chris gayle team lokshahi
क्रीडा

Rohit Sharma : 'हिटमॅन'ने मोडला शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम, आता ख्रिस गेल निशाण्यावर

आता ख्रिस गेल निशाण्यावर

Published by : Shubham Tate

Rohit Sharma : पाच सामन्यांच्या T20I मालिकेतील चौथ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 59 धावांनी पराभव केला. या विजयासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने T20I मालिकेत 3-1 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. (rohit sharma overtakes shahid afridi international cricket new target chris gayle)

वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माकडून मोठी खेळी अपेक्षित होती, पण त्याला चांगली सुरुवात करता आली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात कर्णधार रोहित शर्माने १६ चेंडूंत ३३ धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात दोन चौकार आणि तीन षटकार ठोकले.

तिसरा षटकार मारताच सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहितने शाहिद आफ्रिदीला मागे टाकले. रोहितच्या नावावर आता ४७७ षटकारांची नोंद झाली आहे.

शाहिद आफ्रिदीला हरवले

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आता दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने यात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर 409 सामन्यांमध्ये एकूण 477 षटकार आहेत. शाहिद आफ्रिदीने 476 षटकार (524 सामने) ठोकले आहेत.

रोहितने हा विक्रम नोंदवला

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 477 षटकार मारण्यासोबतच रोहित शर्माने आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने 36 धावांच्या खेळीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 हजार धावाही पूर्ण केल्या. रोहितच्या आधी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त सहा खेळाडूंना 16 हजार किंवा त्याहून अधिक धावा करता आल्या आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या नावांचा समावेश आहे.

सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रोहित गेलला मागे टाकेल

सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलच्या नावावर आहे, त्याने आतापर्यंत 553 षटकार ठोकले आहेत. रोहितकडे आता गेलला मागे टाकण्याची मोठी संधी आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी