राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य कोच नियुक्त
टीम इंडियासंबंधी एक मोठी बातमी बॅटींगचा धुरंधर राहुल द्रविड हा आता टीम इंडियाचा मुख्य कोच असेल. बीसीसीआय ने राहुल द्रविडच्या नाव घोषित केल आहे अशी माहिती वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलंय. राहूल द्रविड कोच म्हणून दोन वर्षांचा कालावधी असेल म्हणजेच 2023 पर्यंत टीम इंडियाची जबाबदारी राहुल द्रविडकडे असेल. काही दिवसात T20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. दरम्यान न्यूझीलंड भारत दौऱ्यावर येणार हे राहूल द्रविडचं कोच म्हणून पहिलं मिशन असेल.
दुबईत बीसीसीआयचे पदाधिकारी असलेले सौरव गांगुली आणि जय शाह यांची राहुल द्रविडसोबत बैठक पार पाडली. त्याच बैठकीत राहुल द्रविडला कोच होण्यासाठी विचारणा केली आणि त्याना राहुलनं होकार दिला. दरम्यान द्रविडचा करार हा 2023 च्या वर्ल्ड कपपर्यंत असेल.द्रविडच्या प्रशिक्षणाखाली काही नवीन युवा खेळाडू आज टीम इंडिया आणि आयपीएलचं मैदान गाजवतायत. राहुल द्रविडला NCA चं हेड बनवलेलं होतं. तिथली जबाबदारी त्यानं चोख पार पाडलीय.आणि या सर्व बाजू बघून बीसीसीआयने हा निर्णय घेतला.बीसीसीआयनं फक्त मुख्य कोचचा निर्णय घेतला नाही तर बॉलिंग कोचचीही निवड केलीय. पारस म्हांब्रेला बॉलिंग कोच म्हणून नियुक्त करण्यात आलंय. सध्या विक्रम राठोड हे बॅटींग कोच आहेत. तेच कायम रहातील. तर फिल्डींग कोच असलेल्या आर. श्रीधरण यांना बदलायचं की नाही किंवा त्यांच्या रिप्लेसमेंटबद्दल अजून कुठला अंतीम निर्णय झालेला नाही.