Singapore Open 2022  Team Lokshahi
क्रीडा

PV Sindhu: पीव्ही सिंधूची जबरदस्त कामगिरी! सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं

Singapore Open Badminton 2022 Final: सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Singapore Open Badminton 2022 Final: सिंगापूर ओपन स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं (PV Sindhu) चीनच्या वांग झि यि (Wang Zhi Yi) हीचा 21-9, 11-21, 21-15 असा पराभव करत विजेतेपद पटकावलं आहे.

पहिल्यांदाच पीव्ही सिंधूनं सिंगापूर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय. दरम्यान, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पी व्ही सिंधूचं कौतुक केलं आहे. त्यांनी ट्वीट करत म्हटलं की, “पी व्ही सिंधूने भारतासाठी चांगली बातमी दिली आहे. तिने पुन्हा एकदा आपली मान अभिमानाने उंचावली आहे. सिंगापूर ओपनचं पदक जिंकल्याबद्दल पी व्ही सिंधू तुझं खूप अभिनंदन. तू करोडो लोकांसाठी प्रेरणा आहेस.”

सिंधूने हा सामना २१-१५, २१-७ असा सरळ सेटमध्ये जिंकला. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर ३०० पदकं जिंकली आहेत. त्यानंतर सिंगापूर ओपनचं तिसरं पदकही तिने आपल्या नावावर केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी