टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सातव्या दिवसापर्यंत भारताच्या वाट्याला अपेक्षेपेक्षा कमी पदकं आली आहेत. अजून उर्वरित सामन्यामध्ये खेळाडूंकडून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा भारतीयांना आहे. या दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र तरी तिने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे.
या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले. तिच्या व्यतिरिक्त दिग्गज बॅडमिंटनपटू सायना नेहवालने लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे.