मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरच्या सामन्यात भारतानं न्यूझीलंडला विजयासाठी तब्बल ३९८ धावांचं आव्हान दिलं होतं. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीनं कमाल करत आपली जबरदस्त कामगिरी दाखवली.
भारताकडून उपांत्य सामन्यात न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव झाला. शमीने न्यूझीलंडच्या सात फलंदाजांना बाद केले. यावर शमीचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, आजचा सेमी फायनल हा आणखी खास ठरला आहे. वैयक्तिक कामगिरीमुळे. मोहम्मद शमीने वन डे वर्ल्ड कपमध्ये केलेली गोलंदाजी क्रिकेटप्रेमी आणि पुढील पिढ्यांच्या लक्षात राहिल. भारताने उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.