श्रीलंकेनं आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. आशिया चषकातील पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील सामना अटीतटीचा ठरला. या सामन्यात 23 धावांनी पाकिस्तानचा पराभव करत सामना जिंकला. श्रीलंकेने पाकिस्तानसमोर विजयासाठी १७१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. २० षटकांमध्ये पाकिस्तानला अवघ्या १४७ धावा करता आल्या.
पाकिस्तानी संघाचा पहिला गडी बाबर आझमने पाच धावाच करुन बाद झाला. इफ्तिखार अहमद आणि सलामीवीर मोहम्मद रिझवान यांनी हे चांगले खेळत होते. दोघांनी ७१ धावांची भागिदारी केली. मात्र १४ व्या षटकात इफ्तिखार अहमद बाद झाला. हरिस रौफने सर्वाधिक तीन बळी घेतले. तर नसीम शाह, शादाब खान, इफ्तिखार अहमद यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली. सलामीवीर कुसल मेंडिस खातंदेखील खोलू शकला नाही. तर पाथुम निसांकाने अवघ्या आठ धावा केल्या. दुसऱ्या विकेटसाठी आलेल्या धनंजया डी सिल्वाने तुलनेने चांगला खेळ केला. त्याने २१ चेंडूंमध्ये २८ धावा केल्या. त्यामुळे १२ चेंडूंमध्ये पाकिस्तानसमोर ५१ धावांची गरज अशी स्थिती निर्माण झाली. शेवटी पाकिस्तानचे खेळाडू वीस षटकांत १४७ धावा करू शकले. परिणामी श्रीलंकेचा २३ धावांनी विजय झाला.