क्रीडा

अर्जुन तेंडुलकरच्या IPLच्या दमदार कामगिरीवर शाहरुख खानचे ट्वीट म्हणाला...

आयपीएलच्या 16 व्या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं

Published by : Siddhi Naringrekar

आयपीएलच्या 16 व्या हंगामात सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या वर्षी त्याला मुंबईकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं.

आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर 14 धावांनी विजय मिळवला. अर्जुन तेंडूलकरने त्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या कारकिर्दीतील पहिला गडी बाद केला आहे. या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला. सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीची संधी दिली. अर्जुनने शेवटच्या षटकात अवघ्या चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अर्जुनच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला.

अर्जुनने शेवटच्या षटकात दोन विकेट घेतल्या. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक पाहायला मिळत आहे. शाहरुख खानने त्याच्यासाठी खास ट्वीट केले आहे. शाहरुखने ट्विट करत लिहिले की, आयपीएल कितीही स्पर्धात्मक असो पण जेव्हा तुम्ही तुमच्या मित्राचा मुलगा अर्जुनला मैदानात उतरुन खेळताना पाहता, तेव्हा खूप आनंद वाटतो. नक्कीच एक आनंदाची गोष्ट असते. अर्जुनला खूप खूप शुभेच्छा आणि सचिन खरंच किती अभिमानाचा क्षण आहे. खूप छान असे शाहरुखने ट्विट करत अभिनंदन केलं आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी