मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होणार आहे. शरद पवार आणि शेलार पॅनलचे अमोल काळे विरुद्ध माजी कसोटीवीर संदिप पाटील यांच्यात थेट लढत आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार प्रताप सरनाईक यांचे चिरंजीव विहंग सरनाईक हेही पवार-शेलार पॅनेलकडून मुंबई ट्वेन्टी ट्वेन्टी लीगच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आले आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर आणि शिवसेना वाहतूक संघटनेचे निलेश भोसले हेही पवार-शेलार पॅनेलकडून कार्यकारिणीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत.वानखेडे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकत्र आले होते. पहिल्यांदाच सर्वजण एकत्र आल्यामुळे राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा झाली.
एमसीएचे एकूण 380 मतदार आहेत. त्यामध्ये मैदान क्लब्स 211, ऑफिस क्लब्स 78, स्कूल कॉलेज क्लब्स 40 आणि माजी कसोटीवीर 51 असे मतदार आहेत. त्यामुळं आता आजच्या या अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील लढतीत कोण बाजी मारणार हे पाहावं लागणार आहे. आज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे.