क्रीडा

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चमकली; हाताला दुखापत होऊनही पटकावले रौप्य पदक

मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण 200 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नवी दिल्ली : भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने मनगटात दुखत असतानाही वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकूण 200 किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले आहे. यादरम्यान तिने टोकियो ऑलिम्पिकमधील चॅम्पियन चीनच्या हौ झिहुआचाही पराभव केला. मीराबाईने 49 किलो गटात स्नॅचमध्ये 87 किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलले.

सप्टेंबरमध्ये प्रशिक्षणादरम्यान मीराबाईच्या मनगटाला दुखापत झाली होती. दुखापत असूनही तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८४ किलो वजन उचलून सुरुवात केली. तिने दुसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले. पण, ते वैध मानले गेले नाही. तिने तिसऱ्या प्रयत्नात 87 किलो वजन उचलले.

स्नॅचनंतर पाचव्या क्रमांकावर असलेल्या चानूने क्लीन अँड जर्कमध्ये पहिल्याच प्रयत्नात 111 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. क्लीन अँड जर्कमध्ये विश्वविक्रम करणाऱ्या मीराबाईने पुढच्या दोन प्रयत्नांत 111 आणि 113 किलो वजन उचलले.

चीनच्या जियांग हुइहुआने एकूण 206 किलो वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये 93 किलो तर क्लीन अँड जर्कमध्ये 113 किलो वजन उचलले. चीनची झिहुआ हिने एकूण 198 किलो (89 आणि 109 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले.

पदक जिंकल्यानंतर मीराबाई म्हणाली, पाच वर्षांनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दुसरे पदक जिंकून मायदेशी परतणे हा माझ्यासाठी भावनिकदृष्ट्या अभिमानाचा क्षण आहे. जागतिक चॅम्पियनशिपमध्ये सर्वोत्कृष्ट ऑलिम्पियन शीर्ष स्तरावर आव्हान म्हणून नेहमीच ताकदीने स्पर्धा करते. माझ्या मनगटात दुखत होते, पण मी देशासाठी जीव द्यायला सदैव तयार आहे. आशियाई खेळ आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकांसह मी भारताला असे आणखी क्षण देईन अशी आशा आहे, असे तिने म्हंटले आहे.

दरम्यान, मणिपूरच्या मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आहे. 2017 मध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. आणखी चार भारतीय लिफ्टर एस बिंदिया राणी देवी (59 किलो), सी ऋषिकांत सिंग (61 किलो), अचिंता शेउली (73 किलो) आणि गुरदीप सिंग (109 किलो) हे देखील जागतिक स्पर्धेत भाग घेतला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी