क्रीडा

SRH VS DC: मॅकगर्कचे अर्धशतक व्यर्थ! हैदराबादने दिल्लीचा 67 धावांनी केला पराभव

आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत झाला.

Published by : Dhanshree Shintre

आयपीएल 2024 च्या 35 व्या सामन्यात, दिल्ली कॅपिटल्सचा सामना सनरायजर्स हैदराबादसोबत झाला. या सामन्यात अनेक विक्रम झाले आणि ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी पुन्हा एकदा हैदराबादला वेगवान सुरुवात करुन दिली. हैदराबादसाठी हेडने चमकदार कामगिरी केली तर दिल्लीसाठी मॅकगर्कने 15 चेंडूत अर्धशतक झळकावून संघाच्या आशा जिवंत ठेवल्या, पण शेवटी हैदराबादने दिल्लीवर सहज विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ट्रॅव्हिस हेडच्या 32 चेंडूत 89 धावा, अभिषेक शर्माच्या 12 चेंडूत 46 धावा आणि शाहबाज अहमदच्या 29 चेंडूत नाबाद 59 धावांच्या जोरावर 20 षटकात 7 गडी गमावून 266 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीसाठी जॅक फ्रेझर मॅकगर्कने झंझावाती खेळी खेळली आणि 18 चेंडूत 65 धावा केल्या, मात्र तो बाद झाल्यानंतर दिल्लीचा डाव फसला आणि संघ 19.1 षटकांत 199 धावा करून सर्वबाद झाला. दिल्लीकडून कर्णधार ऋषभ पंतने 35 चेंडूत 44 धावा केल्या. हैदराबादकडून टी. नटराजनने चार षटकांत 19 धावा देत चार बळी घेतले.

या विजयासह सनरायझर्स हैदराबाद संघाने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे, तर दिल्ली संघ एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचला आहे. पहिल्या स्थानावर 7 पैकी 6 विजय मिळवून राजस्थानने कब्जा केलेले आहे. आयपीएलच्या इतिहासात हैदराबाद पावर प्लेच्या 6 ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करणारी टीम ठरली. हैदराबादने केकेआरचा रेकॉर्ड ब्रेक केला. हैदराबादने बिनबाद 125 धावा केल्या आणि केकेआरचा 105 धावांचा पावर प्लेमधील विक्रम मोडीत काढला.

दोन्ही संघाचे प्लेईंग 11:

दिल्ली कॅपिट्ल्स प्लेईंग 11 :

ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद आणि मुकेश कुमार.

सनरायजर्स हैदराबाद प्लेईंग 11 :

पॅट कमिन्स (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे आणि टी नटराजन.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी