भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे सचिव जय शाह हे आता आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाल्याची बातमी मंगळवारी अधिकृतपणे घोषणा करून सांगण्यात आली आहे. जय शाह यांची अध्यक्षपदी निवड ही कोणत्याही प्रकारचा विरोध न करता झाली आहे असं आयसीसीने म्हटले आहे. तर १ डिसेंबरपासून जय शाह आयसीसीच्या अध्यक्षपद स्वीकारणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. जय शाह हे पाचवे भारतीय आयसीसीचे अध्यपद स्वीकारणारे अध्यक्ष ठरले आहेत. मात्र जय शाह यांना आयसीसीचे अध्यक्ष होताच आता बीसीसीआयचे सचिवपद सोडावे लागणार आहे कारण एकाच वेळी दोन पदे सांभाळणं कठीण जाऊ शकतं. मात्र त्यांच्या जागी आता बीसीसीआयचे सचिवपद कोण सांभाळणार अशी चर्चा सुरु असतानाच दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहन जेटली यांचे नाव सचिवपदासाठी पुढे येत असल्याचे समोर येत आहे.
जय शाह यांच्या आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त होण्याआधी भारतातून इतर चार अध्यक्ष झाले आहेत त्यातील जगमोहन दालमिया हे पहिले आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले होते त्यांची कारकीर्द ही १९९७ ते २००० पर्यंत होती. त्यांच्या नंतर भारतीय राजकारणी शरद पवार यांनी २०१० ते २०१२ पर्यंत आयसीसीचे अध्यक्षपद स्वीकारले होते. यानंतर २०१४ मध्ये एन. श्रीनिवासन हे आयसीसीच्या अध्यक्षपदी दिसून आले. तसेच शशांक मनोहर हे दोनदा आयसीसीचे अध्यक्ष राहिले आहेत त्यादरम्यान २०१५ मध्ये त्यांचा पहिला टर्म सुरू झाला आणि यानंतर २०१८ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले.
आयसीसीच्या अध्यक्षपदी नियुक्तीबाबत बोलत असताना जय शाह म्हणाले, त्यांना सर्वात आधी आयसीसीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. यानंतर ते म्हणाले, सध्या क्रिकेटच्या अनेक फॉरमॅटला प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे आणि त्याचसाठी जागतिक स्तरावर क्रिकेटचा विकास करण्यासाठी मी नेहमी काम करत राहीन. असं म्हणतं असताना पुढे जय शाह म्हणाले, 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश ही एक मोठी उपलब्धी आहे आणि ऑलिम्पिकच्या माध्यमातून आम्ही याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देऊ, असं म्हणत जय शाह हे व्यक्त झाले. यादरम्यान जय शाह यांना भारतीय क्रिकेट टीमच्या खेळाडूंकडून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, ऋषभ पंत यांसारख्या अनेक खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.