इंडियन प्रिमीयर लीग (IPL) या सामन्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. आता या आयपीएलबाबत एक मोठी माहिती मिळत आहे. मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल जसा अगोदर होणार होता तसा होणार आहे. आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे. याची माहिती बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिली आहे.
एका माध्यमाशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला की, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.” असे त्याने सांगितले.