यंदाच्या आशिया चषक ट्वेन्टी-२०च्या (Women Asia Cup Final)अंतिम सामना भारतीय महिला विरूद्ध श्रीलंका महिला असा रंगणार आहे. यावेळी 8 वा सीझन जिंकण्यासाठी भारतीय महिला संघ जोरदार तयारी करत आहेत. भारतीय महिला संघ प्रत्येकवेळी विजेत्यापदाच्या फेरीत पोहोचला आहे. हा सामना शनिवारी म्हणजे आज होणार असून अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे श्रीलंकेचे आव्हान असेल. यंदाच्या आशिया चषक ट्वेन्टी-२० स्पर्धेत भारतीय महिलांनी खूप चांगली कामगिरी केली आहे. या आशिया चषकामध्ये भारताने सहापैकी पाच सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर उपांत्य फेरी भारताने थायलंडला सहज पराभूत करून विक्रमी 8 आशिया चषकाच्या अंतिम फेरी पोहचले.
यंदाच्या आशिया चषकात सलामीवीर शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा या युवा खेळाडूंनी भारताच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या आशिया चषकात भारताला आपले नवीन खेळाडू आजमावण्याची संधी मिळाली. या चषकात कर्णधार हरमनप्रीत कौर तिच्या दुखापतीमुळे तीन सामन्यांना मुकली होती तर उपकर्णधार स्मृती मानधनानेही फारसे योगदान दिले नाही. मात्र यंदाच्या या चषकात भारतीय महिला संघाला केवळ पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तसेच पाकिस्तानच्या संघाला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले . मात्र भारताला श्रीलंकेला हरवण्यासाठी उत्तम कामगिरी करावी लागणार आहे. हा सामना खूप अटीतटीचा असणार असून 8 आशिया चषकाचे विजेतेपद कोण जिंकणार याकडे क्रिकेट प्रेमींचे लक्ष लागले आहे.
IND W vs SL W Final ट्वेन्टी-२० सामन्यासाठीचा संघ :
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, एस मेघना, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, रिचा घोष (डब्ल्यूके), दयालन हेमलता, स्नेह राणा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, रेणुका ठाकूर, मेघना सिंग, किरण नवगिरे पूजा वस्त्राकर.
श्रीलंका: चमारी अटापट्टू (कर्णधार), निलाक्षी डी सिल्वा, कविशा दिलहारी, अचिनी कुलसुरिया, सुगंधा कुमारी, हर्षिता समरविक्रमा, मधुशिका मेथटानंद, हसीनी परेरा, ओधादी रणसिंघे, इनोका रणवीरा, अनुष्का संजीवनी, कौशानी नुथ्यंगना, मालशा शेहानी आणि मालशा शेहानी.